पैठण (प्रतिनिधी): भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिरात पर्यावरणपूरक श्रीगणेश मूर्ती बनविण्या साठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचा अनुभव घेतला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली.
यावेळी मुख्याध्यापक तथा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भास्कर कुलकर्णी, पाचवी ते सातवी कला विभाग प्रमुख शिखा आवं चाणक्य विद्या मंदिर पैठण शाह, पहिली ते चौथी कला विभाग प्रमुख ग्रीष्मा चौके यांची प्रमुख उपस्थिती होती. यासमवेत इयत्ता पाचवी ते सातवीचे सर्व शिक्षक उपस्थित होते.
आर्य चाणक्य विद्यामंदिरचा माजी गुणवंत विद्यार्थी केतन मांदळे याने विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या व कलात्मक पद्धतीने श्रीगणेश मूर्ती घडविण्याचे मार्गदर्शन केले. केतन मांदळे याच्या ङ्गशिवकार्य राज्याभिषेकफ या पुस्तकाचे प्रकाशन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांच्या हस्ते रायगडावर झाले आहे. तसेच त्याने साकारलेले छत्रपती
संभाजी महाराज चौथे यांचे चित्र कोल्हापूरच्या राजवाड्यात लावण्यात आले आहे.
या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना सृजनशीलता, भारतीय संस्कृतीचे संवर्धन आणि पर्यावरण रक्षण यांचे महत्त्व समजले. स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती साकारताना विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला आणि त्यांच्या कल्पना शक्तीला चालना मिळाली. या साठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भास्कर कुलकर्णी यांच्या अध्यक्षीय समारोपाने कार्यक्रमाची सांगता झाली.















